Breaking News

यवतमाळचा दुचाकीचोर गाडयांसह नांदेड पोलिसांच्या ताब्यात

नांदेड, दि. 27 - नांदेड पोलिसांच्या विशेष पथकाने यवतमाळ जिल्ह्यातून दुचाकी गाड्या चोरून नांदेड जिल्ह्यात विक्री करणा-या एका मोटारसायकल चोराला  पकडून त्यास यवतमाळ जिल्हा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.या चोरट्याने चोरीच्या 11 मोटरसायकली अगोदरच विक्री केल्या आहेत.
सारखणी फाटा भागात एक माणूस चोरी केलेल्या मोटारसायकली विक्री करतो अशी माहिती पोलिसांना मिळाली, ते फॉरेस्ट नाकाच्या पाठीमागे पोहचले. तेथे एक  माणूस चार मोटरसायकली घेऊन बसला होता. त्याने आपले नाव दत्ता सुरेश लिंगलवार असे आहे.तो मूळ राहणार सदोबा सावळी ता.आर्णी जि.यवतमाळ येथील  आहे पण सद्या तो गंगाजी नगर ता. माहूर येथे राहतो.त्याने यवतमाळ शहरातील वडगाव, दत्त चौक, बसस्थानक या भागातून मोटरसायकली चोरी केल्याचे सांगितले.  अश्या दुचाकी चो-या करून आणणे आणि त्या गाड्या माहूर, किनवट भागातील लोकांना कमी किमतीत विक्री करणे हाच व्यवसाय असे असे सांगितले.त्याने या  भागातील मोमीन यास चार मोटरसायकली, इम्रान यास चार मोटरसायकली,गुड्डू यास दोन मोटरसायकली आणि छोटू यास एक मोटरसायकल कमी दरात विक्री  केल्याचे सांगितले. दत्ता सुरेश लिंगलवार यास पाच मोटारसायकलींसह या पोलीस पथकाने सिंदखेड पोलीस ठाण्यात आणले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या दुचाकी  गाड्या आणि चोरटा यास यवतमाळ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.