Breaking News

बालगंधर्व रंगमंदिराला यंदा 50 वर्षे पूर्ण, लवकरच कायापालट होणार

पुणे, दि. 27 - शहराच्या सांस्कृतीक वैभवात भर टाकणार्‍या बालगंधर्व रंगमंदिराला यंदा 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेक नाट्यकलावंताना नावलौकिक मिळवुन  देणार्‍या या रंगमंचाचा सुवर्णमहोत्सवी वर्षात रिहर्सल रूमपासून मुख्य कलामंचापर्यंत संपुर्ण कायापालट करणार असल्याणा महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी केली. 
पालिकेच्या वतीने बालगंधर्व यांच्या जयंतीनिमित दिला जाणारा बालगंधर्व पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ व्यवस्थापक मनोहर कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला यावेळी त्या  बोलत होत्या. याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे, आयुक्त कुणाल कुमार, गटनेते श्रीनाथ भिमाले, नगरसेविका ज्योत्सना एकबोटे, आदित्य मावळे आदी उपस्थित होते.  एक लाख अकरा हजार रूपये, शाल, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच यावेळी यश रूईकर (पुरूषोत्तम करंडक विजेते), विठ्ठल हुलावळे (नेपथ्यकार),  चंद्रशेखर देशपांडे (ऑर्गनवादक), अस्मिता चिंचाळकर (अभिनय व गायन) आणि दत्तत्रय शिंदे (सेटींग) यांचाही सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना कुलकर्णी म्हणाले, व्यवस्थापन म्हणजे केवळ तिकिट विक्री नाही, अलिकडे मोबाईलमुळे व्यवस्थापन करणे सोपे झाले आहे. मात्र 1956  साली मी जेंव्हा या व्यवसायात आलो त्यावेळी ते काम कठिण होते. 120हुन अधिक नाट्यसंस्थाशी माझा संबध आला. माझ्या यशामध्ये प्रामाणिकपणा महत्वाचा  ठरला असे सांगत त्यांनी आठवणींना उजाळा दिला.
माधव वझे म्हणाले, नाटकाचा शो मस्ट गो ऑन म्हणने सोपे असते मात्र तो शो पुढे नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे काम कुलकर्णी यांनी केले. महापालिका  नाट्यकलावंताचा सन्मान करतेच, पालिकेने प्रायोगिक नाटकांनाही पारितोषीके देऊन सन्मानीत करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अनुराधा राजहंस यांनी  सुत्रसंचालन केले, श्रीनाथ भिमाले यांनी आभार मानले.