Breaking News

जगाच्या पोशिंद्यावर संप करण्याची वेळ आली हे खेदाची गोष्ट - माजी मंत्री पिचड

मधुकरराव पिचड यांचा 76 वा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न; तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

अकोले, दि. 02 - संपुर्ण राज्यभर शेतकरी आजपासून संपावर जात आहे. त्यांना कोणताही नेता नाही, सामान्य शेतकरी संपावर जात आहे. जगात 36 देशांना अन्नधान्य पुरविणार्‍या शेतकर्‍यांची आज दुरावस्था झाली आहे. त्याचे शेतमालाला बाजारभाव नाही. कर्जबाजारी झाला आहे. शेतकरी दुःखात आहे त्याला साथ देण्याचे काम करावे असे आवाहन करुन आज वाढदिवसानिमित्त ज्या जुन्या लोकांनी साथ दिली. त्याच्यामुळे मी घडू शकलो. स्वाभीमानी अकोले तालुका निर्माण करु शकलो त्या सहकार्‍यांचा आज सत्कार केला याचा आनंद असून भविष्यातही असेच चांगले राजकारण रहावे अशी अपेक्षा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केली.
राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तालुक्याचे भाग्यविधाते मधुकरराव पिचड यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त त्याचा अभिष्ठचिंतन सोहळा व त्याच्या जेष्ठ सहकारी नागरिकांचा कृतज्ञता सोहळा अगस्ति आश्रमाच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. यावेळी सत्काराला उत्तर देताना पिचड बोलत होते. सुरवातीस तालुक्यातील पिचड सोहबांनी उभारलेली निळवंडेसह 19 धरण बंधारेचे पाणी कलशात आपून सवाद्य मिरवणूकीने अगस्ति आश्रमता येवून अगस्ति ॠषींचा जलाभिषेक करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी दामु अण्णा सहाणे हे होते. व्यासपिठावर आदर्श सरपंच हेमलताताई पिचड, रंगनाथ वाकचौरे, लक्ष्मण शिंदे, आ. वैभवराव पिचड, विठ्ठल आभाळे, शब्बीर शेख आदींसह पिचड परिवार उपस्थित होता.
पुढे बोलताना माजी मंत्री पिचड म्हणाले की, आपण सामान्य शेतकर्‍यांसाठी प्रामाणिकपणे काम केले. लोकांनी योग्य निवड केल्यानेच आपण 7 वेळा विधानसभेवर जाऊ शकलो मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर पहिला नारळ अगस्तिला फोडून अगस्ति महाराजाकडे तालुका सुजलाम, सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना केली होती. ती महाराजांनी पुर्ण केली आहे. आपण तालुक्यात अनेक धरणे, बंधारे, रस्ते अशी विविध विकास कामे करु शकलो याचे श्रेय तालुक्यातील जनतेला आहे. तालुक्यातील या जेष्ठ लोकांनी साथ दिली. म्हणून समाज कार्यात स्वत गाठून घेत आले. तालुक्यातील अनेक प्रश्‍न सर्वांच्या सहकार्याने सोडविला आले.
आज देशाचा पोशिंदा शेतकरी स्वतःचे नुकसान करुन संपावर जात आहे. कारण शेतकरी इतबल झाला आहे. त्याच्या शेतमालाला कवडी मोल बाजार भाव नाही. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. आज शेतकर्‍याला भाकड गाय विकायला सर्टिफिकेट देण्याची वेळ या सरकारने आणली आहे. अतिशय वाईट अवस्था शेतकर्‍याची झाली आहे. आदरणीय पवार साहेबांकडे दृष्टी असल्याने त्यांनी शेतकर्‍यांसाठी अनेक योजना अवंलबविल्या होत्या. मात्र या सरकारला शेतकर्‍यांचे काही देणे घेणे नाही. आज हे ऐतखाऊ सरकार आहे. या ऐतखाउ सरकार विरुध्द शेतकर्‍यांची लढाई आहे. या लढयात शेतकर्‍यांना साथ द्यावी लागणार आहे. हे भाजपा सरकार जबाबदारी ढकलण्याचे काम करत आहे. आता हे सरकार आश्रमशाळेतील मुलांना वहया, पुस्तके, कपडे हे देण्याचे बंद करुन दरमहा मुलांना पैसे देणार आहे. आता मुलांच्या हातात पैसे मिळालेनंतर उद्या मुळे बिघडतील मात्र त्यांचे शिक्षण अधुरेच राहिल.
हे सरकार पुर्वीचे आघाडी सरकारने केलेल्या कामांचेच उद्घाटन श्रेय होत आहे ते तसेच तालुक्यातही आपण सुरु केलेल्या विकास कामाचे श्रेय घेण्याचा उपद्रव्याप सुरु झाला असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी आ. पिचड म्हणाले की, वाढदिवस साजरा करण्याचे नेहमी टाळत असे ते नेहमी वाढदिवस साजरा करण्याचे नेहमी टाळत असे ते नेहमी वाढदिवस, निळवंडे धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त यांच्यामध्ये त्यांच्या प्रश्‍न सोडवण्यात घालत असे. त्यांनी नेता म्हणून काम करताना प्रत्येक दिवस लोकांच्या कानासाठी घातला. 1980 साली पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. तालुक्यातील अश्यक ते काम शक्य करणारे नेते पिचडसाहेब आहेत. मुळाा विभागात मुळा बांधणीचे काम त्यांनी केले. केटी वेअर, बंधारे बांधून मुळा बारमाही केली. निळवंडे धरण झाले, वंचितांना पाणी देण्यासाठी उच्चस्तरीय कॅनाल निर्माण केले. आदिवासी भागाला ही पाणी देण्याचे काम केले एकुणच तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे काम साहेबांनी केली. साहेब देशाचे आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत. साहेब आज आमदार नाहीत तरी ते कायम मला मार्गदर्शन करुन लोकाचे प्रश्‍न विधानसभेत मांडून सोडविण्याचा आग्रह धरतात. आमदारांनी कामात लक्ष घालतात. तालुक्यातील आपल्या सर्वांच्या प्रेमाणे साहेबांचे नेतृत्व गहिवरत गेले असच कौटुंबिक नात या पुढील काळातही वृध्दींगत होत राहो अशी अपेक्षाही आ. पिचड यांनी केली.
यावेळी सीताराम पा. गायकर, मधुकर नवले, रंगनाथ पा. वाकचौरे, मीनानाथ पांडे, परबत नाईकवाडी, म. ना. वाकचौरे यांची भाषणे झाली.