गावातील व्यवहार बंद ठेवून शेतकरी संपाला पाठींबा
अकोले, दि. 02 - गणोरे येथील ग्रामस्थांनी 1 जुन रोजी एक दिवस व्यवहार बंद ठेवून संपुर्ण गाव बंद ठेवुन शेतकरी संपाला पाठींबा दिला आहे.
गणोरे येथे व्यापारी संघटनेने आपले व्यवहार बंद ठेऊन कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी दहा वाजता भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शेतकरी विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणुन पारंपारिक पध्दतीने नेहमी प्रमाणे सायरन वाजवुन माधव भंडारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. गावात एखादे मयत झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयावर बसवलेला सायरन वाजवला की अंत्ययात्रेसाठी नागरिक जमा होतात सायरण वाजल्याने फोन सुरु झाले. कोण गेले, काय नाही माधव भंडारीची अंत्ययात्रा निघाली आहे. यावेळी शेतकर्यांनी विविध प्रकारच्या घोषणा देऊन आपला राग व्यक्त केला. ये माधव काय केलरं भाऊ शेतकर्याचं पार वाटोळे केले रं भाऊ.अशा प्रकारची रडारड व प्रतिकात्मक हावभाव करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
या नंतर शेवटी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी कमानी जवळ पुतळ्यास जोडे मारून जाळण्यात आले.
यावेळी उपसरपंच संतोष आंबरे, रावसाहेब आहेर, बाळासाहेब दातीर, राजेंद्र आंबरे, बाळासाहेब शिंदे, अंबादास दातीर, सुभाष भालेराव, शेतकरी संघटनेचे नेते शुभम आंबरे, सुशांत आरोटे, अशोक आहेर, गोपाल दुध संस्थेचे अध्यक्ष अनिल आंबरे, उपाध्यक्ष चंद्रभान आहेर, सोसायटीचे उपाध्यक्ष देवराम आंबरे, भास्कर शिंदे, अनिल आहेर, भाऊसाहेब भालेराव, सुभाष आहेर, गोरख आहेर, निवृत्ती आंबरे यांच्या सह फार मोठा जनसमुदाय उपस्थित होता.