यश मिळविण्यासाठी ध्येय्य निश्चित करुन परिश्रम घ्या : आ.पिचड
अकोले, दि. 27 - सध्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढविण्यामागे शिक्षकांचा आई वडीलांचा व विद्यार्थ्यांचा परीश्रमाचा मोठा वाटा आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्याला या पुढे जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले कर्तृत्व सिध्द करावे लागेल. त्यासाठी सर्वांनी खुप अभ्यास करा, व आपले ध्येय निश्चित करुन त्यासाठी परीश्रम घ्या व प्रतिभावान व्हा, असे प्रतिपादन अकोले तालुका एयुकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त आ.वैभवराव पिचड यांनी केले.
अकोले तालुका एज्यूकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या तालुक्यातील 10 वी, 12 वी, पॉलीटेक्नीक व आय.टी. आय मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी श्री. पिचड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जे.डी. आंबरे पा.होते. यावेळी उपाध्यक्ष मधुकरराव सोनवणे, सेक्रेटरी यशवंतराव आभाळे, सहसेक्रेटरी अॅड्.भाऊसाहेब गोडसे, खजिनदार एस पी देशमुख, सदस्य बाळासाहेब भोर, राहुल बेणके, महाविद्यालयाचे प्राचार्य संजय ताकटे, आय टी आय चे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, उपप्राचार्य प्रकाश जगताप, पर्यवेक्षक डॉ.सुनिल शिंदे,संस्थेचे शिक्षणाधिकारी एस. पी. मालुंजकर, ह.भ.प.रामनाथ महाराज जाधव, भाऊसाहेब वाळुंज, आदिसह सर्व विद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व गुणवंत विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
आ.पिचड पुढे म्हणाले की, अकोले तालुक्यातील शैक्षणिक मागासलेपण घालविण्यासाठी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आदिवासी भागात मोठया प्रमाणावर आश्रमशाळा सुरु केल्या. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिकवून आज चांगल्या पदावर कार्यरत आहेत. अकोले तालुका एयुकेशन सोसायटीचे आपला शैक्षणिक विस्तार तालुक्याच्या काना कोपर्यात केला असुन उच्चशिक्षणाची सुविधा एम.बी.ए., एम.सी.ए, पॉलीटेक्नीक सुरु करुन दिलेली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडीलांचे या काबाड कष्टाची जाणीव ठेवावी. तुमच्या यशामध्ये संस्था, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांचे मोठे योगदान आहे. या संस्थेमध्ये चांगली गुणवत्ता असलेले विद्यार्थी घडविलेले आहे. शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता चांगली आहे. याचा लाभ घेवून जीवनात प्रतिभावान बना असे आ.पिचड यांनी मनोगतात व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगातात जे.डी. आंबरे पा. म्हणाले की, गुणवंत विद्यार्थ्यांना मिळालेले गुण हे कौतुकास्पद आहे. गुण पुढील परीक्षेत मिळवुन खर्या अर्थाने जीवनात गुणवान व्हा. शिक्षकांनी असेच परीश्रम घ्यावे व चांगले विद्यार्थी घडवावे. कर्तव्यात कसुर करु नये. पालकांनी आपले मते मुलांवर लाटु नये. त्यांच्या आवडीनुसार त्यांना करीयर करण्यास मार्गदर्शन करावे, विद्यार्थ्यांनी आपली क्षमता पाहून पुढील शिक्षण निवडावे, आवडीचे क्षीत निवडावे व त्यात करीयर करावे. उद्या बदलणारे बदल आज लक्षात घ्यावे.
उपाध्यक्ष मधुकर सोनवणे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी जीवनात शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात मुली चमकत आहेत. आजच्या विद्यार्थींची बौध्दीक क्षमता चांगली आहे. संस्थेमध्ये सर्व पक्षाचे सदस्य कार्यरत असुन चांगल्या विचारांनी प्रेरीत झाल्याने संस्था शैक्षणिक प्रगती करीत आहे.
प्रास्ताविकामध्ये एस पी देशमुख म्हणाले की, ही संस्था तालुक्यातील मातृसंस्था असुन तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही त्याची परिणीती आहे. सुत्रसंचलन प्रा.डॉ.नितीन आरोटे व प्रा.संदेश कासार यांनी केले तर आभार संस्थेचे सह सेक्रेटरी अॅड्.भाऊसाहेब गोडसे यांनी मानले.