Breaking News

दुषीत पाणी प्रश्‍नासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उपायुक्तांना घेराव

अहमदनगर, दि. 07 - प्रभाग क्र. 14 मधील भुतकरवाडी परिसरात गेल्या 15 दिवसापासून नळाद्वारे दुषित पाणीपुरवठा होत असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मनपा आयुक्त यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मनपा आयुक्त दिलीप गावडे हजर नसल्याने, उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांना स्थानिक नागरिकांनी घेराव घालून निवेदन दिले. बेहेरे यांनी या प्रकरणाची पहाणी करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे संबंधीत अधिकार्यांना तातडीने  पाठवून, दोन दिवसात काम मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले.
भुतकरवाडी परिसरात 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्याची लाईन फुटून ड्रेनेजचे मैलमिश्रीत पाणी नागरिकांना नळाद्वारे येत आहे. परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून, दुषित पाण्याने कावीळ, गॅस्ट्रो व पोटदुखी सारख्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहे. मागील आठवड्यापासून पाऊस सुरु झाल्याने नळाद्वारे दुषित पाणी येवून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. तातडीने पिण्याच्या पाण्याची पाईपलाइन दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, अमित भुतकर, नितीन लिगडे, ऋषीकेश ताठे, सारंग पंधाडे, भारत जाधव, किरण पंधाडे, राजू कोकणे, सागर गुंजाळ, निखील ताठे, दिपक खेडकर, सोनू गायकवाड, वैशाली ताठे, कल्पना जगताप, आशा भुतकर, लता भुतकर, द्वारका सोलाट, कौशल्या भुतकर, जयश्री भुतकर, उषा भुतकर, पप्पू भुतकर, निकेश भगत, भगवान भुतकर, योगेश अजबे, बाळासाहेब भुतकर, निशांत लांडे आदिंसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.