Breaking News

प्रत्येकाने एक तरी झाड लावावे

अहमदनगर, दि. 07 - वृक्षारोपण हि काळाजी गरज आहे. पर्यावरणाचा र्‍हास थांबविण्यासाठी झाडे लावण्याची गरज आहे. झाडांमुळे पर्यावरणाचे रक्षण होते. पाऊस पडण्यास मदत होते. बर्‍याच वर्षापासून वृक्षांची अनेक करणांमुळे तोड होते. परंतु वृक्षारोपणाचे कार्यक्रम होत नाही. त्यामुळे दुष्काळ सर्वत्र दिसत आहे. पर्यावरण दिनानिमित्त सर्वांनी एकत्र येवुन वृक्षारोपण करावे. प्रत्येकाने आपले कर्तव्य समजुन एकतरी झाड लावावे व त्यांचे संगोपन केल्यास पर्यावरणाचा र्‍हास थांबेल व हरितक्रांती होईल, असे प्रतिपादन माजी नगरसेवक रुपसिंग कदम यांनी केले.
जागतिक पर्यावरण व वृक्षारोपण दिनानिमित्त ब्रीज ऑफ होप माळीवाडा प्रोजेक्ट अ.नगर यांच्या वतीने कोठी रोड वरील इंदिरानगर वसाहतीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रंसगी माजी  नगरसेवक रुपसिंग कदम बोलत होते. या कार्यक्रमास माजी नगरसेविका शैला कदम, सुषमा कांबळे-क्षत्रिय, समीना पठाण, अनिता थोरात, सरला जाधव, तेरेजा पोळ, वर्षा सगळगिळे, शितल कांबळे, सुनिल भांबळ, सुधीर शिंदे, आकाश साळवे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.