Breaking News

नांदेड जिल्हयात समाधानकारक पाऊस

नांदेड, दि. 29 - मागील तीन वर्षांच्या तुलनेत नांदेड जिल्ह्यात पडणारा सरासरी पाऊस आणि त्याची आजपर्यंतची आकडेवारी पाहता यंदा आजपर्यंत पाऊस  समाधानकारक झाल्याचे चित्र दिसत आहे. नांदेड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 955.55 मी.मी. पाऊस पडतो. 1 जुन ते 31 ऑक्टोबरपर्यंत या पावसाची अशी सरासरी  असते. सन 2015 मध्ये 1 जुन ते 26 जुन दरम्यान 10.62 मी.मी. पाऊस पडला आहे. सन 2017 मध्ये याच काळात 184.54 मी.मी. पाऊस पडला आहे.  यंदाच्या वर्षात 198.40 मी.मी. पाऊस पडला आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा पडलेला पाऊस समाधानकारक आहे असे आकडेवारीवरून  दिसतेजिल्ह्यात 24 तासांत 214.55 मी.मी. पाऊस झाला आहे. आजपर्यंतच्या सरासरीत 148.78 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. मी.मी. निहाय चालू वर्षांत  आजपर्यंत 2380.51 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत किनवटमध्ये सर्वाधीक 25.43 मी.मी. पाऊस झाला आहे आणि सर्वात कमी 6.71  मी.मी. पाऊस हदगावमध्ये झाला आहे. एकूणच सन 2017 पावसाची आजपर्यंतची स्थिती समाधानकारक आहे.