Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा देशात 21 वा क्रमांक

औरंगाबाद, दि. 29 - भारतातील विद्यापीठांचे राष्ट्रीय रँकींग घोषित करण्यात आले असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने देशात 21 वा क्रमांक  पटकाविला आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे यांनी दिली.
व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात बुधवारी दि.28 आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी ‘इंटरनल क्वालिटी अ‍ॅटयूरन्स सेल‘चे संचालक डॉ.सचिन  देशमुख यांची उपस्थिती होती. 2017-18 या शैक्षणिक वर्षातील भारतीय विद्यापीठांचे राष्ट्रीय रँकीग ‘इंडिया टुडे‘ तर्पेै घोषित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय  संस्था ‘निल्सन‘ च्या माध्यमातून हे रँकींग करण्यात आले आहे. भारतातील 500 विद्यापीठांची प्राथमिक यादी तयार करुन हे रँकींग तयार करण्यात आले.  ‘असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्र्हसिटीज्‘ हँडबूकच्या आधार यासाठी घेण्यात आला. ‘फेब्रुवारी व मार्च 2017‘ मध्ये देशातील सुमारे 600 शिक्षणतज्ञांनी यासाठी  कार्य केले. शंभर गुणांच्या या मानांकनासाठी एकुण 11 मापदंड निश्‍चित करण्यात आले होती. यामध्ये विद्यापीठाची प्रतिमा, प्राध्यापक, संशोधन प्रकल्प, विद्याथ्र्यांचा  दर्जा, विद्याथ्र्यांसाठी सुविधा, नवोन्मेष व प्रशासन, प्रवेश प्रक्रिया, प्लेसमेंट, जागतिक दर्जा, विद्याथ्र्यांची सुरक्षा आदी निकष होते. विशेषत: डॉ.बाबासाहेब आंबेडकर  मराठवाडा विद्यापीठाने अत्यंत कमी शुल्कात दर्जेदार शिक्षण व संशोधन कार्य केल्यामुळेच देशातील पहिल्या 25 विद्यापीठात स्थान पटकाविले आहे.
दरम्यान ‘द विक-हंस रिसर्च सव्र्हे 2017‘ अंतर्गत देशातील विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांचे रँकींग घोषित करण्यात आले आहे. यामध्ये भारतातील राज्य विद्यापीठांमध्ये  हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठाचा (542 गुण) पहिला क्रमांक आला आहे. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने (319 गुण) 36 वा क्रमांक  मिळविला आहे. संशोधन, नवोन्मेष, पायाभूत सुविधा याआधारे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.‘विक-हंस‘च्या रँकींग मध्ये आपल्या विद्यापीठाने पहिल्या 50 मध्ये  सातत्याने स्थाने अबाधित ठेवले आहे. दरम्यान ‘नॅशनल इन्स्टिटयूशनल रँकींग मध्ये विद्यापीठाने 101 ते 150 या गटात आपला क्रमांक पटकाविला आहे.