501 वृक्षरोपण अभियानाचा प्रारंभ
अहमदनगर, दि. 07 - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त साईद्वारका सेवा ट्रस्ट व हेल्प मी इंडिया संस्थेच्या वतीने 501 वृक्षरोपण अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. पै.शुभम दातरंगे व आदित्य बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देवून तोफखाना येथे वृक्षरोपणाने अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी साईद्वारका सेवा ट्रस्टचे संस्थापक अॅड.धनंजय जाधव, अशोक दातरंगे, रोहन शिरसाठ, दिपक पवार, अक्षय दातरंगे, सागर शेळके, राजू पवार, मनोज कानडे, दिनेश घोडके, अक्षय दातरंगे, राहुल मुथा, सोमनाथ जाधव, महेश महादर आदि उपस्थित होते.
अॅड.धनंजय जाधव म्हणाले की, वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला पाहिजे. वाढते शहरीकरण व प्रदुषणाने पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, वृक्षरोपण व संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. वृक्षरोपण चळवळ युवकांनी हाताळल्यास बदल घडणार आहे. पर्यावरण दिन साजरा करत असताना यामागचा उद्देश व महत्त्व सर्वसामान्य नागरिकांना कळणे आवश्यक आहे. ही मोहिम राबविताना संस्थेचे कार्यकर्ते वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्विकारुन, त्याचे संगोपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.