Breaking News

वाहनात गोमांस असल्याच्या संशयावरून झारखंडमध्ये एकाची हत्या

रामगड, दि. 30 - झारखंडमध्ये गाडीत गोमांस असण्याच्या संशयावरुन आणखी एकाची हत्या करण्यात आली आहे. मारूती व्हॅनमध्ये बीफ असल्याच्या संशयावरून  जमावाकडून एकाला मारहाण करण्यात आली. अलीमुद्दीन उर्फ असगर अन्सारी असे त्याचे नाव आहे.त्यानंतर त्याला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू  झाला.याप्रकरणी याप्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरक्षणाच्या नावाखाली कुणाची हत्या करणे हे सहन केले जाणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. तरीही या हत्येच्या घटना सुरू असल्याचे दिसत  आहे.
अलीमुद्दीन हा मांस विक्रेता असून तो गाडीतून मांस घेवून जात होता. त्यावेळी हे गोमांस असल्याची अफवा पसरवण्यात आली. त्यानंतर जमावाने त्याची गाडी रोखली  त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याची गाडीही पेटवून देण्यात आली.