Breaking News

जवानांविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी आझम खान यांच्याविरोधात तक्रार दाखल

लखनौ, दि. 30 - भारतीय जवानांविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली  आहे. आझम खान यांच्याविरोधात हजरतगंज आणि गौतमपल्ली पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
आझम खान यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी जानकी शरण पांडे यांनी हजरतगंज पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तर, हिंदू जागरण मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तर  आझम खान यांचा पुतळा जाळत निषेध व्यक्त केला. तसेच त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई केली जावी अशी मागणीही करण्यात येत आहे.
महिला लष्कर जवानांचं गुप्तांग कापून सोबत घेऊन जात आहेत. हात किंवा मुंडक न कापता शरिरातील ज्या भागासंबंधी त्यांची तक्रार होती तोच भाग कापून ते घेऊन  गेले. त्यांनी एक मोठा संदेश दिला असून संपुर्ण हिंदुस्थानाला याची लाज वाटली पाहिजे, असे वक्तव्य आझम खान यांनी केले होते.