Breaking News

सेंट पीटर्सबर्ग येथे पंतप्रधान मोदी यांनी वाहिली दुस-या महायुद्धातील शहिदांना श्रद्धांजली

सेंट पीटरबर्ग, दि. 02 - रशियामधील सेंट पीटर्सबर्ग येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुस-या महायुद्धातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. दुस-या  महायुद्धादरम्यान जवळपास पाच लाख जवान शहीद झाले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची भेट घेतली. यावेळी  पंतप्रधान मोदी पुतीन यांच्याबरोबर 18 व्या भारत - रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.
यादौ-यादरम्यान भारत आणि रशियामधील विविध करारांवर स्वाक्षरी करण्यात येणार असल्यामुळे पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.  पंतप्रधान मोदी हे चार देशांच्या दौ-यावर आहेत. या देशांमध्ये जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रान्स या देशांचा समावेश आहे. या दौर्‍यादरम्यान अर्थिक, सुरक्षा,  विज्ञान, उद्योगधंदे आणि आण्विक क्षेत्रासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहेत.