Breaking News

एगॉन टेनिस स्पर्धा : मरे सलामीलाच गारद; बोपण्णा-डॉडीग जोडीची आगेकूच

लंडन, दि. 22 - एगॉन क्वीन्स क्लब टेनिस स्पर्धेत आज अव्वल मानांकित अँडी मरेचेर आव्हान सलामीच्या फेरीतच संपुष्टात आले. ऑस्ट्रलियाच्या जॉर्डन थॉम्पसन  याने त्याला 7-6 (7-4), 6-2 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. 1 तास 43 मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिला सेट टायब्रेकरपर्यंत लांबला. अखेर तीन  गुणांच्या फरकाने जॉर्डन पहिला सेट जिंकला. दुसरा सेट तुलनेन जॉर्डनसाठी खूपच सोप गेला आणि दुसरा सेट जिंकत त्याने मरेला पराभूत केले. हा मरेच्या  कारकिर्दीतील सर्वात वाईट पराभव आहे.
तर, दुसरीकडे भारताच्या रोहन बोपण्णा-इवॅन डॉडीग या इंडो-क्रोएशियन जोडीने स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा थानासी कोक्कीनाकीस  आणि अमेरिकेचा कायल एडमंड या जोडीला 6-3, 6-7, 10-7 असे पराभूत केले.