Breaking News

भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकाची पेरूमध्ये अमेरिकेच्या राजदूत पदी नियुक्ती

वॉशिंग्टन, दि. 30 - अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे अमेरिकेन नागरिक कृष्णा आर उर्स यांची पेरूमध्ये अमेरिकेच्या नव्या राजदूत पदी  नियुक्ती केली. 1986 पासून कार्यरत असलेले अमेरिकन राजनैतिक उर्स सध्या माद्रिदमध्ये अमेरिकेचे प्रभारी आहेत. 
या पूर्वी अमेरिकेच्या राजदूत पदी निक्की हेली यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिकेच्या राजदूत पदी हेलीची  नियुक्ती केली होती. अमेरिकन प्रशासनाच्या मंत्रिमंडळ स्तरावर नियुक्ती करण्यात आलेल्या हेली या पहिल्या भारतीय अमेरिकन नागरिक ठरल्या आहेत.