Breaking News

तरच सहा मुस्लिमबहुल देशांना मिळणार अमेरिकेचा व्हिसा

वॉशिंग्टन, दि. 30 - अमेरिकेत एखाद्या नागरिकाचे जवळचे कौटुंबिक किंवा व्यापार संबंध असल्यास अमेरिकेचा व्हिसा मिळणार असल्याचे अमेरिकेने नवीन धोरण  जाहीर केले आहे. अमेरिकेने सहा मुस्लिम बहुल देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदी केली आहे. अमेरिकेत जवळचे कौटुंबिक किंवा व्यापार संबंध असल्यास या  सहा मुस्लिम बहुल देशांतील नागरिकांना व्हिसा मिळू शकेल.
यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली असून सहा देशांतील नागरिकांना व्हिसासाठी अर्ज करताना पालक, मुलगा - मुलगी, जावई किंवा भाऊ - बहिणींचे  नाते असल्यास व्हिसा मिळणार आहे. मात्र, आजी-आजोबा काका -काकू असे नाते असणा-यांना व्हिसा मिळणार नाही. कौटुंबिक नात्यांसह व्यापार संबंध  असल्यासही या सहा देशांतील नागरिकांना व्हिसा मिळू शकेल.