Breaking News

पूंछ सेक्टरमध्ये पाकच्या गोळीबारात दोन जवान जखमी

जम्मू, दि. 30 - पाकिस्तानने पुन्हा सीमे रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला. जम्मू काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात  भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी झाले आहेत. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने काल रात्री 1.30 च्या सुमारास पुंछ सेक्टरमध्ये गोळीबार केला. पाकिस्तानने  सब्जियान सेक्टरमध्येही गोळीबार केल्याचे समजते. भारतीय चौक्यांवर पाककडून गोळीबार करण्यात आला.
पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्करानेही चोख प्रत्यूत्तर दिले. यात गोळीबार दोन जवान जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची  माहिती कर्नल मनीष मेहता यांनी दिली.  या पूर्वीही पाकिस्तानी सैन्यानी नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.