Breaking News

शहरात घरफोडी चोरी करणारी टोळी गुन्हे शाखेने केली जेरबंद

। आठ दिवसापूर्वी घरफोडी केल्याची आरोपींनी दिली कबुली

अहमदनगर, दि. 17 - शहरात घरफोडी, चोरी करणारे सराईत तिघांजनांची टोळी गुन्हे शाखेकडुन जेरबंद करण्यात आली आहे. यामध्ये मनोज गोरख मांजरे (वय 19 रा.निर्मलनगर,पाईपलाईन रोड), काळु बाबुलाल जाधव (वय 19 रा.पाईलपलाईन रोड), मनोज गोरख मांजरे (वय44 ) यांना पोलिसांनी शिताफीने जरबंद केले आहे. 
सवितस्तर मिळालेली माहिती अशी की, गुप्त माहितीदारा कडुन शहरात घरफोडी तसेच चोरी करणारी गुन्हेगार हे गुलमोहर रोड परिसरात येणार ही माहिती मिळाल्यानंतर पथकातील सपोनि संदीप पाटील, पोहेकॉ योगेश गोसावी, पोहेकॉ मन्सुर सय्यद, उमेश खेडकर, दत्ता हिंगडे, संदिप पवार, रावसाहेब हुसळे, संदिप घोडके, रविकिरण सोनटक्के दिपक शिंदे, विशाल अमृते, प्रमोद जाधव, योगेश सातपुते, सचिन कोळेकर यांनी गुलमोहर रोडवर सापळा रचुन थांबले असता गुलमोहर रोडवर दोन इसम बजाज पल्सर गाडीवर संशयित रित्या त्यांना फिरताना आढळले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवा उडविची उत्तरे दिली. यानंतर त्यांना नाव विचारले असता त्यांनी मनोज गोरख मांजरे, बाबुलाल जाधव, असे सांगितले. तसेच त्यांच्या ताब्यातील विना नंबरची पल्सर मोटारसायकलची विचारपुस केली असता सदर मोटारसायकल हि माझा भाऊ सागर मांजरे यांने कोठुनतरी चोरुन आणली आहे. तसेच सागर व त्याचा मित्र करण पुर्ण नाव माहिती नाही असे आम्ही मिळुन तोफखाना हद्दीत आनंदनगर गुलामहोर रोडवरील एका घरात सुमारे 8 दिवसापूर्वी घरफोडी केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्याचा भाऊ सागर याचा शोध घेतला असता सागर व मनोज यांना गुन्ह्यात मदत करणारे त्यांचे वडील गोरख मारुती मांजरे (वय 44, रा.निर्मलनगर पाईलपलाईनरोड) हा मिळून आला. सागर मात्र पोलिसांना पाहुन पळुन जाण्यात यशस्वी झाला. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी तोफखाना पोलिस स्टेशनल येथे चौकशी करत त्यांच्यावर गुरनं 195/2017 भादवि 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हयातील आरोपी मनोज गोरख मांजरे, काळु बाबुलाल जाधव, मनोज गोरख मांजरे याच्यावर कारवाई साठी तोफखाना पोलिसाच्या ताब्यात दिले आहे. सदर आरोपीकडुन आणखी काही चोर्‍यांच्या गुन्ह्याचही कबुली  मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून  काही आरोपी हे गंभीर गुन्हयात फरार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.