काळ्या बाजारात गुजरातला विक्रीसाठी जाणारा रेशनचा तांदूळ जप्त
औरंगाबाद, दि. 22 - गुजरात येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी रेशनचे तांदूळ घेवून जाणारा ट्रक ग्रामीण गुन्हे शाखेने पकडला असून सदर ट्रक हा जालन्यातून निघाल्याची माहिती गुप्तहेराकडून ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. औरंगाबाद जालना रोडवर हा ट्रक पोलिसांनी अडवला.सदर तांदूळ हा आठ लाख रूपयाच्या किंमतीचा होता. चालकाला अटक केली आणि ट्रकमधील रेशनचा स्वस्तधान्य दुकाचा तांदूळ जप्त केला.या प्रकरणातील चौघेजण फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.