ट्रक टेम्पोच्या धडकेत दोन माणसे आणि पंचवन शेळया ठार
औरंगाबाद, दि. 22 - औरंगाबाद शहराजवळ पळसवाडी शिवारात ट्रक आणि टेम्पोच्या भीषण अपघातात दोन माणसे आणि पंचावन शेळया ठार झाल्या आहेत.आज सकाळी सात वाजता ही घटना घडली.आयशर टेम्पोमध्ये शेळया होत्या हा टेम्पो औरंगाबादकडे येत होता.सकाळची वेळ असल्याने टेम्पोच्या केबीनमधले दोघे झोपेत होते.पळसवाडी वळणावर सदर टेम्पो समोरून येणा-या ट्रकवर आदळला या अपघातात दोघेजण जागीच मरण पावले एकाचे तर शीर धडावेगळे झाले तर टेम्पोचा चुराडा होवून त्यातील सगळया म्हणजेच पंचावन शेळया मरण पावल्या. किरिट परमार व शैलेश परमार या दोघा जखमींवर घाटी रूग्णालयात उपचार चालू आहेत. अपघाताता शेळयांचा मृत्यू झाल्याची जिल्हयातील ही आठवडयातील दुसरी घटना आहे. 16 जून रोजी धुळयाहून निजामाबादकडे शेळया घेवून जाणा-या ट्रकची पीकअप व्हॅनला धडक होवून चाळीस शेळया ठार झाल्या होत्या.