मागील भांडणाच्या कारणावरुन एकास बेदम मारहाण; आठ जणांवर गुन्हा दाखल
संगमनेर, दि. 22 - शेळ्यांसाठी शेतात गवत आणण्यास गेलेल्या एकास मागील भांडणाच्या कारणावरुन आठजणांनी लोखंडी गज व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करुन जबर जखमी केले. ही घटना मंगळवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास आश्वी बुद्रूक शिवारात घडली. या घटनेने आश्वी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने मोठा फौजफाटा तेथे तैणात केला आहे.
सोनु राखपसरे (रा. आश्वी बुद्रूक) हा तरुण मंगळवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास राजू कदम यांच्या शेतामध्ये शेळ्यांना गवत आणण्यासाठी गेला होता. यावेळी सात ते आठ तरुण दुचाकीवरुन येत मागील भांडणाचे वाद काढून सोनु राखपसरेला लोखंडी गज व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याने आरडाओरड केल्याने जवळस असलेल्या नागरीकांनी घटनास्थळी धाव घेवून त्याची सुटका केली. त्याला मारहाणीत जबर दुखापत झाल्याने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने आश्वी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस कुमक बोलवली. यावेळी संगमनेरचे पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार, हवालदार एकनाथ खाडे, विजय फटांगरे, आशिष आरोडे, एस. आर. मालुंजकर, पांडूरंग कावरे, संजय मंडलिक, महादु खाडे, एकनाथ बर्वे, सुनिल सरोदे, शिवाजी पवार, अनिल शेगाळे, आदींनी चोख बंदोबस्त ठेवला असून पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी नागरीकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. परिसरात तणावपुर्ण शांतता असून पोलिसांचा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे.
यांदसर्भात सोनु नाना राखपसरे यांनी आश्वी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन आर्सद सिकंदर शेख, रिजवान आजीज शेख, चाँद अहमद शेख, रमजान मधुभाई शेख, जावेद अहमद शेख, अफरोज सलिम शेख, चाँद शेख यांचा भाचा व बालमचा मोठा मुलगा नाव माहित नाही आदी आठ जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर 57/17, भारतीय दंड संहिता 143, 147, 148, 149, 326, 223, 504, 506, मुंबई पोलीस अॅक्ट 37 (1), (3), 135 चे उल्लंघन नुसार दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक एस. बी. लाटे करत आहे. काल रात्री उशिरापर्यंत यातील कोणासही अटक करण्यात आली नव्हती.