शेतकरी संपास सांगली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद
सांगली, दि. 02 - शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे व शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी शेतक-यांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत संप आंदोलनाला सांगली जिल्ह्यात हिंसक वळण लागले. कर्नाटक राज्यातून होणारा भाजीपाला व दूध पुरवठा रोखण्यासाठी शेतक-यांच्यावतीने मिरज येथे रास्ता रोको करण्यात आला, तर तासगाव तालुक्यातील येळावी व कवठेएकंद या दोन गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गाव बंदची हाक देत रास्ता रोको केले. विविध शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी उद्या शुक्रवारपासून हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे, शेतीमालाला हमीभाव मिळावा, निवृत्ती वेतन व इर्मा कायदा लागू करावा, यासह अन्य विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शेतक-यांनी दि. 7 जूनपर्यंत बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाच्या आजच्या पहिल्या दिवशी सांगली जिल्ह्यातही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. सांगली शहरातील बाजारपेठेत शेतकर्यांनी कोणताही भाजीपाला अथवा अन्य माल विक्रीस आणला नाही. या शेतकरी संपामुळे सांगली जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्या व भाजीपाला बाजारातही काहीसा शुकशुकाट जाणवत होता.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरी भागाकडे होणारा भाजीपाला व दूध पुरवठा रोखण्याचा निर्णय ग्रामीण भागातील ठिकठिकाणच्या शेतक-यांच्यावतीने घेण्यात आला होता. परिणामी गुरूवारी सकाळपासून गावातील कोणताही शेतीमाल शहरी भागातील बाजारपेठेत आला नाही. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास कवठेमहांकाळ तालुक्यातून मुंबई शहराकडे जाणारा दुधाचा एक टँकर कवठेमहांकाळ- मिरज मार्गावर रोखून धरत त्या वाहनाचे टायर ङ्गोडण्यात आले, तर कडेगाव येथे दूध संकलन करणारी वाहने रोखून धरत जमा केलेले दूध रस्त्यावर ओतून देण्यात आले. सकाळच्या प्रहरी कमी झालेली या आंदोलनाची तीव्रता गुरूवारी सायंकाळपासून अधिक तीव्र करण्याचा निर्धारही शेतकर्यांच्यावतीने करण्यात येत आहे.
शेतक-यांनी पुकारलेल्या या आंदोलनाला शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी कृती बचाव समिती, महाराष्ट्र किसान सभा व अन्नदाता शेतकरी संघटना यांच्यासह विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केल्याने या आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे. या संपाला सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळाला. प्रमुख गावातील बाजारपेठा बंद ठेवून व विक्रीस आलेला भाजीपाला व दूध रस्त्यावर ओतून केंद्र व राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.
तासगाव तालुक्यातील येळावी व कवठेएकंद या दोन गावातील ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून रास्ता रोको करून या शेतकरी संपात आपला सहभाग नोंदविला. या आंदोलन कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. उद्या शुक्रवारपासून हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विविध शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे. या आंदोलन कालावधीत शहरी भागाकडे भाजीपाला व दूध घेऊन येणा-या प्रमुख मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे राज्य प्रचारप्रमुख संजय कोले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, तुंग, समडोळी व कवठेपिरान यासह प्रमुख गावात जाऊन शेतकर्यांना शेतीमाल व दूध बाजारात विक्रीस न आणण्याचे आवाहन केले. उद्या शुक्रवारपासून शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गटागटाने संपूर्ण सांगली जिल्ह्याचा दौरा करून शेतकरी बांधवांना या संपात सहभागी होण्याचे आवाहन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बुधवारी रात्री उशिरा आत्मक्लेश यात्रेचा समारोप करून सांगली जिल्ह्यात परतले. त्यामुळे आक्रमक असलेल्या या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी दिवसभर विश्रांती घेऊन शुक्रवारपासून आक्रमक होणार असल्याचे सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शहरी भागाकडे होणारा भाजीपाला व दूध पुरवठा रोखण्यासाठी नियोजन केले जात असून या आंदोलन कालावधीत कार्यकर्त्यांकडून होणारे नुकसान शेतक-यांनी टाळावे व आपला उत्पादित माल गावातच ठेवावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे यांनी केले आहे.