भुमिपुत्र शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा
जळगाव, दि. 02 - जिल्हासह राज्यातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी 1 जून पासून संपावर जात आहेत. त्या पार्श्वभूमिवर आज भूमिपूत्र शेतकरी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. दरम्यान शेतक-यांच्या संपाला पाठींबा व्यक्त करण्यात आला असून जोपर्यंत शासन शेतक-यांच्या मागण्या मान्य करत नाहीत, तोपर्यंत शेतकरी दुध व भाजीपाला विक्रीला आणणार नाही. असा निर्णय घेण्यात आला आहे.
संघटनेच्या वतीने दुपारी 12 वाजता शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. मोर्चात सहभागी शेतकरी अर्धनग्न मोर्चा काढणार म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यात प्रामुख्याने स्वामीनाथन आयोग लागू करणे, कापसाला 10 हजार भाव देणे, वयोवृध्द शेतकरी व शेतमजूराला दरमहा 5 हजार रुपये पेन्शन लागू करणे, शेतकरी व शेतमजूरांचा 5 लाखांचा विमा काढणे, आत्महत्याग्रस्त कुटूंबीयांना 5 लाखाची मदत द्यावी व मुलांना मोफत शिक्षण देवून शासकीय नोकरी द्यावी, कर्जमाफी करण्यात यावी, दिवसभर 12 तास वीज पुरवठा सुरळीतपणे करण्यात यावा, केारडवाहू शेतीला पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा, शेती उत्पादन खरेदी करणार्या व्यापार्यांना परवाना बंधनकारक करावा, व बिना परवाना माल खरेदी करणार्यांना शिक्षा करावी. अन्न धान्याची आयात कमी करुन निर्यात वाढवावी यासह इतर मागण्यांचा समावेश आहे. यावेळी विजेंद्र परदेशी, रविंद्र पवार, वसंत कोळी, राहुल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, नगराज पाटील, गोविंदा पाटील, अध्यक्ष किरण पाटील आदी उपस्थित होते.