कर्जमाफीच्या मुद्दयावर मुख्यमंत्री आणि शरद पवारांची दिल्लीत बैठक
नवी दिल्ली, दि. 23 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही वेळापूर्वीच दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी 6 जनपथकडे रवाना झाले आहेत. शेतकर्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात बैठक होणार असल्याचं समजतं आहे. दरम्यान, या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलही हजर असणार आहेत.
एकीकडे राष्ट्रपतीपदाचा निवडणूक अर्ज भरण्याची आज लगबग सुरु असताना दुसरीकडे मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यातील ही भेट महत्त्वाची मानण्यात येत आहे. मागील अनेक महिन्यांपासून शेतकर्यांच्या कर्जमाफीसंदर्भात राज्यात आंदोलनं सुरु आहेत. यावरुन पवारांनीही सरकारवर वारंवार निशाणा साधला आहे. त्यामुळे आज या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार? याकडेच आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, दिल्लीतील 6 जनपथवर शरद पवारांच्या घरीच ही बैठक पार पडणार आहे. दरम्यान याआधी राष्ट्रवादीची एक अंतर्गत बैठक होणार असून त्यासाठी दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, धनंजय मुंडेही हजर आहेत.