12 वर्षांनी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर!
सिंधुदुर्ग, दि. 23 - तब्बल 12 वर्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे आज एकाच मंचावर येणार आहेत. या निमित्ताने भाजप आणि शिवसेनेने जोरदार पोस्टरबाजी केली आहे. सिंधुदुर्गात आज मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं भूमीपूजन होणार आहे. राजशिष्टाचारानुसार जिल्ह्यातील स्थानिक आमदार म्हणून नितेश राणे आणि विधान परिषद आमदार नारायण राणे यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. त्यामुळे नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.
2005 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे उद्धव ठाकरेंसोबत व्यासपीठावर येण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल.या कार्यक्रमाला केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित असतील. कुडाळच्या बस डेपो मैदानावर हा कार्यक्रम होत आहे. त्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी 400 हुन अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.