सनी लिओनीच्या कार्यक्रमात धक्काबुक्की
लातूर, दि. 01 - अभिनेत्री सनी लिओनीच्या हस्ते आज लातूरमधील एका फिटनेस क्लबचे उदघाटन झाले मात्र ती आल्यावर गर्दी होण्याच्या शक्यतेने उदघाटन लवकर उरकले. तरिही पत्रकार आणि बरेच लोक जमा झाले होते पत्रकारांनी सनीला काही प्रश्न विचारले तेंव्हा सनी उत्तर देण्याच्या आत आयोजकांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली तेंव्हा नाराज झालेल्या पत्रकारांना सनी ओके म्हणत सावरले.
पत्रकाराने सनीला आपण बोल्ड चित्रपटात काम करता याबाबत आपणास वाईट वाटते का? असा प्रश्न विचारला.त्यावर आयोजकांनी प्रश्नावर आक्षेप घेत बाचाबाची केली. धक्का-बुक्की झाली. नंतर आयोजकांनी सारवासारव करत त्याच ठिकाणी माफी मागीतली.