वयोमर्यादा संपल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांचे राजीनामे
सांगली, दि. 01 - राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शरद लाड यांच्यासह अन्य चार पदाधिकार्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. जादा वय असलेल्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत राहू नये, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्यानेच आपण राजीनामे देत असल्याचे या सर्वांनी सांगितले.
शरद लाड यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वाळवा तालुका अध्यक्ष संजय पाटील, मिरज तालुका अध्यक्ष प्रमोद इनामदार व जत तालुका अध्यक्ष उत्तम चव्हाण अशा चौघांनी राजीनामे दिले आहेत. या सर्वांनी आपापल्या पदाची 33 वर्षे पूर्ण ही मर्यादा ओलांडली असल्याने आपण राजीनामे देत असल्याचा खुलासा केला.
मुंबई येथे गत महिन्यात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी 33 पेक्षा अधिक वय असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत राहू नये, अशी सूचना केली होती. त्यानुसार आम्ही चौघाजणांनी आपापल्या पदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते- पाटील व सांगली ग्रामीण जिल्हा अध्यक्ष माजी आमदार विलासराव शिंदे यांच्याकडे सादर केले आहेत.
अपेक्षेपेक्षा अधिक काळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदावर काम करण्याची संधी आपणाला मिळाली आहे. आता सध्या सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. यापुढील कालावधीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये नव्या व होतकरू युवकांना संधी मिळावी, याच हेतूने आपल्यासह या सर्वांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. यापुढे जिल्हा कार्यकारिणीत काम करणार असून शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर थेट रस्त्यावर उतरून लढा उभारणार आहोत. लवकरच केंद्र शासनाच्या गोवंश हत्याबंदी कायद्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन उभारणार असल्याचे शरद लाड यांनी सांगितले.