कामातील हलगर्जीपणामुळे दोन महापालिका कर्मचारी निलंबित
नवी मुंबई, दि. 01 - नागरिकां योग्य रितीने विहित वेळेत व्हावीत व हे करताना महापालिका अधिकारी - कर्मचारी यांनी कार्यालयीन शिस्तीचे पालन करावे अशाप्रकारे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाच्या सुनियोजितपणावर व गतिमानतेवर भर दिला आहे.
या अनुषंगाने कामात निष्काळजीपणा करणा-या महापालिका अधिकारी - कर्मचारी यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येत असून बेलापूर विभाग कार्यालयातील वरिष्ठ लिपिक राजेश सखाराम राऊत व वाहनचालक शशिकांत शांताराम ठाकरे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्याकडे सोपविलेल्या कामात निष्काळजीपणा करीत रस्ते - पदपथांवर फेरीवाल्यांना बसण्यास प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष मदत केल्याप्रकरणी आणि फेरीवाल्यांना कारवाईच्या आगावू सूचना दिल्यामुळे या दोन कर्मचा-यांच्या विरोधात ही शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येऊन त्यांना पुढील आदेश होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांचेकडे सोपविलेले काम विहित वेळेत व नियमानुसार योग्य रितीने करावे आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशाप्रकारचे निर्देश या कारवाईच्या माध्यमातून महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यामार्फत देण्यात आले आहेत.