Breaking News

सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक नदीत कोसळल्याने चालक,वाहकाचा जागीच मृत्यू

राजुरा, दि. 21 - राजूरा-बल्लारपूर मार्गावर सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक वर्धा नदीत कोसळल्यामुळे चालक व वाहकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. ही घटना आज  सकाळी सात वाजता घडली.ट्रक चालक किशोर पेंट्या गोपी आणि वाहक आनंद अलमदा दोघेही असे मृत व्यक्तींचे नावे आहे.
हा ट्रक राजुरा-बल्लारपूर मार्गाने नागपूरकडे जात असतांना ट्रक पुलावर आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. त्यामुळे दोघांचाही मृतदेह  शवविच्छेदनासाठी राजूरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले होते.