मुंबईत पावसाचा जोर, लोकल रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने
मुंबई, दि. 27 - मुंबई शहरासह उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 30 मिनिटं तर पश्चिम रेल्वेची वाहचूक 15 मिनिटं उशिरानं सुरु आहे. कुर्ला-सायन रेल्वे ट्रॅकवर साचले पाणी आहे. मध्य रेल्वेवर सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.
मुंबईतील मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, पवई, घाटकोपर, अंधेरी, वांद्रे या भागात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाच्या जबरदस्त बॅटिंगमुळे हिंदमाता, किंग्ज सर्कल, सायन, अंधेरी, जेव्हीएलआरजवळ पाणी साचलं आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे, शीळफाटा, घणसोलीतही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे चाकरमान्यांनी पावसाचा आणि रेल्वेच्या वेळापत्रकाचा अंदाज घेत नियमित वेळेआधीच घर सोडावं.