भायखळा जेलमध्ये हत्येपूर्वी महिला कैद्यावर लैंगिक अत्याचार
मुंबई, दि. 27 - भायखळा जेलमध्ये महिला कैद्याच्या हत्येपूर्वी तिच्यावर सहा महिला अधिकार्यांकडून लैगिंक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंजुळा शेट्ये हिच्याकडून दोन अंडी व पाच पावांचा हिशेब लागत नसल्याचे निमित्त करून तिला मारहाण करण्यात आली. एका बॅरेकमध्ये मंजुळाला नग्न करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसेच तिचा लैंगिक छळही करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकारानंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी धीर देत महिला कैद्यांना बोलतं केलं. तेव्हा इतर महिला कैद्यांनी घडल्या प्रकाराची माहिती त्यांना दिली. त्यानंतर एका महिला कैद्याच्या तक्रारीवरुन नागपाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. तक्रारीत कैदी महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. आता पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील साक्षीदारांना तपास पूर्ण होईपर्यंत अन्य कारागृहात हलवण्यात यावे अशी मागणी शेट्ये कुटुंबीयांनी केली आहे.