हरियाणाच्या मनुषी छिल्लरला ’फेमिना मिस इंडिया’चा किताब
मुंबई, दि. 27 - हरियाणाची मनुषी छिल्लर 2017 ची ‘फेमिना मिस इंडिया’ ठरली आहे. जम्मू काश्मीरची साना दुआ पहिली उपविजेती, तर बिहारची प्रियांका कुमारी दुसरी उपविजेती ठरली. मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये रविवारी रात्री हा लखलखता सोहळा पार पडला. दिल्लीच्या सेंट थॉमस शाळेत आणि सोनपतमधील भगत फूल सिंग वैद्यकीय महाविद्यालयात मनुषीचं शिक्षण झालं. मनुषीचे आई-वडीलही डॉक्टरच आहेत.
‘आयुष्यात अनिश्चितता ही एकमेव निश्चितपणे घडणारी गोष्ट आहे. फेमिना मिस इंडियाच्या किताबाबद्दल ही अनिश्चितताच मला भावते’ असं मनुषीने हा मान पटकवण्यापूर्वी म्हटलं होतं. विनाली भटनागरला मिस अॅक्टिव्ह क्राऊनने सन्मानित करण्यात आलं, तर वामिका निधीला ‘बॉडी ब्युटिफूल’ हा अवॉर्ड देण्यात आला. यावर्षी देशभरातील 30 राज्यात या पेजंटचा फेरफटका झाला. स्पर्धेत त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंडमधील प्रतिभावान युवतींनी सहभाग घेतला होता.
अंतिम फेरीत स्टेफनी डेल व्हॅले, अर्जुन रामपाल, बिपाशा बासू, मनिष मल्होत्रा, अभिषेक कपूर, विद्युत जामवाल, एलियाना डिक्रुझ यांनी परीक्षण केलं.