शेख बहाद्दुर देउबा यांनी घेतली नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ
काठमांडू, दि. 08 - नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेख बहाद्दुर देउबा यांनी आज नेपाळच्या 40 व्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
माओवादी नेता पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या जागी देउबा चौथ्यांदा पंतप्रधान झाले. सत्ता विभाजनाच्या करारांतर्गत नऊ महिन्यांनंतर प्रचंड यांनी राजीनामा देत देउबा यांचे नाव सुचवले होते.
देउबा यांच्यासह नेपाळी काँग्रेसचे 3, माओवादी सेंटरचे तीन व नेपाल लोकतांत्रिक फोरमचे एक, अशा एकूण सात जणांनी शपथ घेतली. देउबा यांनी तीन उपपंतप्रधान व चार मंत्र्यांसह आठ सदस्यीय मंत्रिमंडळाची स्थापना केली. 12 वर्षांपूर्वी नेपाळचे राजा ज्ञानेंद्र बीर ब्रिकम शाह देव यांनी त्यांना पदावरून हटवले होते.