सुरक्षेच्या कारणास्तव कोविंद यांच्या निवासस्थानात बदल
नवी दिल्ली, दि. 23 - सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या निवासस्थानात बदल करण्यात आला आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक होईपर्यंत कोंविद यांची राहण्याची सोय केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्या शासकीय निवासस्थानात करण्यात येणार आहे.
20 जून रोजी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. आता ते 10 अकबर रस्त्यावरील सरकारी बंगल्यात राहणार आहेत.सध्या या ठिकाणी केंद्रीय मंत्री महेश शर्मा राहत आहेत.