लेखक ल.म. कडू यांना साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर; राहुल कोसम्बी यांना युवा पुरस्कार
नवी दिल्ली, दि. 23 - लेखक ल.म. कडू यांना खारीच्या वाटा या कादंबरीसाठी आज साहित्य अकादमीचा मराठी भाषेसाठी वर्ष 2017 चा बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे तर, उभं-आडवं या कथा संग्रहासाठी राहुल कोसम्बी यांना युवा पुरस्कार जाहीर झाला आहे.
साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी मंडळाने आज बाल साहित्य पुरस्कार व युवा पुरस्कार 2017 ची घोषणा केली. देशातील 24 भाषांमधील लेखक व त्यांच्या कलाकृतींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. बाल साहित्य पुरस्कारासाठी मराठी भाषा विभागात चित्रकार-लेखक ल.म. कडू यांच्या खारीच्या वाटा या कादंबरीची निवड करण्यात आली. राष्ट्रीय बालदिनी दिनांक 14 नोव्हेंबर 2017 रोजी विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. ताम्रफलक आणि 50 हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
श्रीमती माधुरी पुरंदरे, सुश्री कविता महाजन आणि श्रीमती विजया राजाध्यक्ष या लेखिकांच्या त्रिसदस्यीय निवड मंडळाने खारीच्या वाटा या कादंबरीची निवड केली असून त्यास कार्यकारी मंडळाने मान्यता दिली. लेखक राहुल कोसम्बी यांच्या उभं-आडवं या कथासंग्रहाची निवड युवा पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. ताम्रफलक आणि 50 हजार रूपये असे या पुरस्कार स्वरूप असून विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. आसाराम लोमटे, लक्ष्मण गायकवाड आणि भालचंद्र मुणगेकर या लेखकांच्या त्रिसदस्यीय निवड मंडळाने उभं-आडवं या कथा संग्रहाची निवड केली असून त्यास कार्यकारी मंडळाने मान्यता दिली.