रामनाथ कोविंद 23 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार
नवी दिल्ली, दि. 23 - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद (23 जून) राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरताना कोविंद यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग,राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय अर्थमंत्री व संरक्षण मंत्री अरूण जेटली, शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल, केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि परराष्ट्रीय मंत्री सुषमा स्वराज यांची उपस्थिती असणार आहे.