Breaking News

दोन कोटी देणगी प्रकरणी आप वर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली, दि. 22 - देणग्यांच्या रकमेत गैरव्यवहार केल्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने आम आदमी पक्षाविरोधात (मनी लाँड्रिंग) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल  केला आहे. या आधी देणगी नव्हे तर आम आदमी पक्षाचे उत्पन्न आहे, असे आयकर विभागाने म्हटले होते.
2015 मध्ये आम आदमी पक्षाला 50-50 लाख रुपयांच्या 4 ड्राफ्टच्या माध्यमातून 2 कोटी रुपये मिळाले होते. ही रक्कम देणगी असल्याचे पक्षाचे म्हणणे होते. मात्र  पक्षाने एकाच व्यक्तीच्या नावे बोगस कंपन्या स्थापन करून 50-50 लाख रुपयांच्या देणग्या घेतल्याचा आरोप अवाम या स्वयंसेवी संस्थेने केला होता. त्यानंतर दिल्ली  सरकारमधील माजी मंत्री कपिल मिश्रा यांनीही पक्षावर आरोप केले होते. देणग्यांच्या माध्यमातून पक्ष काळा पैसा सफेद करत असल्याचे मिश्रा यांनी म्हटले होते. या  सर्व आरोपांनंतर केलेल्या चौकशीअंती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.