राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी शुभम शिंगणे
बुलडाणा, दि. 22 - देऊळगाव मही येथिल सामाजिक क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे शुभम शिंगणे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदिप मेहत्रे यांनी केली असून नियुक्तीचे पत्र माजीमंत्री डॉ.राजेंन्द्रजी शिंगणे साहेब यांच्या हस्ते शुभम शिंगणे यांना देण्यात आले.
यावेळी शुभम शिंगणे यांनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विचार जिल्ह्यात पोहोचवणार असून विद्यार्थ्यांचे प्रश्न विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन यावेळी शुभम शिंगणे यांनी केले. तसेच राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र शिंगणे यांचा विश्वास सार्थ ठरवेल, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा परीषद सदस्य रियाजखा पठान, युवक राष्ट्रवादीचे देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष गजानन शिंगणे तथा राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.