प्रसंगी शेतक-यांसाठी समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध - उद्धव ठाकरे
औरंगाबाद, दि. 27 - आम्ही विकासाच्या विरोधात नाही पण वेळ पडली तर समृद्धी महामार्गाच्या विरोधात शेतक-यांसाठी आंदोलन करू असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादजवळ माळीवाडा येथे मराठवाडा दौरा सुरू करताना झालेल्या सभेत दिला. कर्जमाफी फॅशन मानणा-या लोकांकडून शिवसेनेने कर्जमाफी करून घेतली असून आताही शिवसेना गप्प बसणार नाही, तर 40 लाख शेतक-यांचा सातबारा कोरा झाल्याचे मोजून घेणार असे ते म्हणाले.
आजपासून उध्दव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरू झाला .शेतक-यांच्या कर्जमाफीनंतर हा शेतक-यांशी संवाद साधणारा दौरा होता त्यात त्यांनी माळीवाडा भागास भेट दिली.समृध्दी मार्ग हा माळीवाडा भागातून जात असल्याने येथे आज सकाळी संवादसभा घेण्यात आली. या वेळी ठाकरे म्हणाले की, काही भागातील शेतकरी अजूनही त्रस्त आहे. त्यासाठी अभ्यासगटाची स्थापना करा. कर्जमाफी फॅशन मानणा-या लोकांकडून शिवसेनेने कर्जमाफी करून घेतली. आम्ही शेतक-यांच्या प्रश्नावर राजकारण करत नाही राजकारणाला येथे स्थान नाही राजकारणापेक्षा कर्जमाफीची अंमलबजावणी होणे महत्वाचे होते. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या भुमिकांचा त्यांनी समाचार घेतला. या दोनही पक्षांचा कर्जमाफीशी काही संबंध नाही.असेे ते म्हणाले तर आता शेतक-यांना साले म्हणणा-यांचे पोस्टर्स लावा साले म्हणून शेतक-यांची हेटाळणी करणा-यांना झुकविले आणि कर्जमाफी करायला लावली, असा टोमणा त्यांनी रावसाहेब दानवे यांना मारला.या वेळी समृध्दी महामार्ग अंदोलकांनी त्यांना आपल्या समस्या सांगितल्या.शिवसेना ही विकासाच्या विरोधात नाही असे असते तर मुंबई रस्त्याला विरोध केला असता. मुंबईमध्ये अनेक उडडाणपुल झाले आहेत. समृद्धी महामार्ग होऊ नये ही मागणी नाही, पण शेतक-यांची काय मागणी आहे हे समजून घ्यावे लागेल. काही शेतकरी जमीन न देण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. तर काही शेतकरी त्यांच्या जमिनी देणार आहेत. या महामार्गासाठी सुपीक जमीनी जात आहे. त्यामुळे याबाबत अभ्यास करण्यासाठी मुंबईला बैठक घेतली जाईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या वेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.
वेळप्रसंगी शिवसेना समृद्धी महामार्ग विरोधात आंदोलन करील असा इशाराही त्यांनी दिला. शेतकरी आणि शिवसेना एकत्र आल्याने शेतक-यांना कर्जमाफी शक्य झाली कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतक-यांनी आंदोलन केले पण या आंदोलनादरम्यान पुणतांब्यातील ज्या शेतक-यांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते तातडीने मागे घ्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. औरंगाबादमधील संवाद यात्रेनंतर 29 जूनपासून उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. या दौ-यात पुन्हा एकदा शेतक-यांच्या सूचनांची आणि मागण्यांची माहिती घेतली जाणार आहे.