शेवगाव हत्याकांड प्रकरणातील 2 आरोपींना अटक
अहमदनगर, दि. 27 - संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणा-या तसेच पोलीस दलाला देखील चक्रावून टाकणा-या शेवगावमधील चार जणांच्या हत्याकांडाचे गूढ उकलण्यात पोलिसांना 7 व्या दिवशी यश मिळाले आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी थरारक कारवाई करीत 2 जणांना अटक केली.मात्र 3 आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलिसांनी त्यांचाही शोध सुरू ठेवला आहे.
उमेश हरिसिंग भोसले व अल्ताफ छगन भोसले अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.18 जून रोजी शेवगावमधील विद्यानगर परिसरात राहाणारे माजी सैनिक अप्पासाहेब हरवणे,त्यांच्या पत्नी सुनंदा,मुलगी स्नेहल व मुलगा मकरंद या चौघांची गळे चिरून अतिशय निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता.जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा हे खुनाच्या घटने पासून शेवगावमध्ये तळ ठोकून असतांनाही आरोपींचा शोध लागत नसल्याने पोलीस दल चक्रावले होते.दरम्यान पोलिसांनी आरोपीची माहिती देणा-यास 50 हजाराचे इनाम देखील जाहीर केले होते.नेवासे तालुक्यातील बाभुळखेडा परिसरात काही संशयित आरोपी फिरत असल्याची माहिती एलसीबी च्या पोलीसांना मिळाली होती.त्यानुसार रविवारी पोलिसांनी बाभुळखेडा परिसरात शोध सुरू केला होता.त्याच वेळी एका मोटारसायकल वरून दोन आरोपी भरधाव वेगाने जातांना पोलीसांना दिसले.पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला.पोलिसांनी त्यांचा पाठलाग करूनही हे आरोपी हाती लागू शकले नाहीत.दरम्यान त्याच परिसरात काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकल वरून आणखी आरोपी पळून जाताना दिसले.त्यांना पकडण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी पोलिसांना धारदार शस्त्र फेकून मारले.तसेच पोलिसांवर दगडांचा मारा केला.मात्र पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपींची मोटारसायकल खाली पडली त्याचवेळी पोलिसांनी झडप घलून एका आरोपीला पकडले.दुसरा आरोपी जवळच्या एका ऊसाच्या शेतात लपला होता.त्यालाही पोलिसांनी शोधून काढीत अटक केली.दरम्यान तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत.