Breaking News

मोगादिशूमधील जिल्हा मुख्यालयावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू

मोगादिशू, दि. 21 - सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील जिल्हा मुख्यालयावर आज करण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला. आज  सकाळी दुध पोहोचवणा-या गाडीच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता  असल्याचे मोहम्मद हुसैन यांनी सांगितले. या हल्ल्याची जबाबदारी अल शबाब या दहशतवादी संघटनेनी घेतली आहे.
या हल्ल्यात 18जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. यात दोन महिलांचाही समावेश आहे. तसेच दोन अन्य महिलांचा मृत्यू झाल्याचे रुग्णावाहिकेच्या  अधिका-यांकडून सांगण्यात आले. दहशतवादी कारवायांवर नजर ठेवणा-या एसआयटीई यंत्रणेनुसार, हल्ल्याची जबाबदारी घेणारी अल शबाब ही संघटना अल कायदा  या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे.