Breaking News

’ग्राहकांनी समाज माध्यमांवरील संदेशांवर विश्‍वास ठेवू नये’

सातारा, दि. 08 - आयडीबीआय बँकेतर्फे विस्तारीत कार्यवाही धोरणाला सुरु झाली आहे. भांडवली आधार आणि एन.पी.ए.च्या पुनर्प्राप्तीवर लक्ष केंद्री  करण्याबरोबरच ही सुरुवात करण्यात आली आहे. आयडीबीआय बँकेचे सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत. समाज माध्यमांवर आयडीबीआय बँकेबाबत फिरत असणार्‍या  संदेशावर विश्‍वास न ठेवता ग्राहकांनी थेट नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन महाप्रबंधक ब्रीज मोहन शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे.
या पत्रकार परिषदेला क्षेत्रीय प्रमुख (उप महाप्रबंधक) सिद्धनाथ बाबर उपस्थित होते. माहिती देताना श्री. शर्मा पुढे म्हणाले, आयडीबीआय बँकेसाठी जोमदार पुनर्प्राप्ती  आणि इतर गोष्टींसाठी प्रतिबंध हे प्रमुख घटक आहेत. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आलेला ताण पाहता कॉर्पोरेट लोक बुकच्या प्रगतीवर बँक निर्बंध घालेल आणि रिटेल  आणि प्रमुख घटक असलेल्या मालमत्तेवर आधारित क्षेत्राच्या वाढीवर लक्ष केंद्रीत करेल. यामुहे बँकेला मालमत्ता क्षेत्रातील जोखीम कमी करण्यास आणि लघुकालीन  सीएआर सुधारण्यास मदत होणार आहे.
याशिवाय मधल्या काळातल्या अतिरिक्त भांडवलाच्या वाढीसाठीही बँक योजना आखत आहे. याद्वारे भारत सरकारच्या येत्या वर्षाच्या सुरुवातीच्या काळातील  प्राधान्यक्रमावरील भागांच्या वाटपाद्वारे तब्बल 1900 कोटी रुपयांच्या भांडवलांचे एकीकरण प्राप्त झाले आहे, यामुळे समान इक्विटीच्या प्रमुख भाग टायर एकच्या  भांडवलाचा विस्तार झाला आहे. याशिवाय लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे बँकेच्या प्राधान्यक्रमावरील इक्विटी इश्यू सबस्क्राइब करण्यात आला आहे.  तसेच सीएआरमध्ये नॉन कोअर सेटच्या विक्रीद्वारे सुधारणा होईल. भारत सरकारचा पाठींबाही पुढे मिळत राहील आणि पोर्टफोलिओतील जोखमीत घट होण्यासाठी  कॉर्पोरेट लोक बुकचा पुन्हा एकदा विचार केला जाईल. बँक यापुढे दर घटविण्याकडे लक्ष देईल आणि कालानुरुप नॉन कोअर संपत्तीची विक्री होईल. तंतोतंत  वेळापत्रक आणि विक्रीचे प्रमाण हे बाजारपेठांमधील परिस्थिती आणि बँकेने सुरु केलेल्या उपक्रमांवर आधारित असेल.
आमची भांडवली परिस्थिती सुधारावी यासाठी आम्ही शक्य त्या सर्व घटकांचा विचार करत आहोत आणि बँकेला पुन्हा एकदा मुळ पदावर आणणार आहोत. आम्ही  जोमदार पुनर्प्राप्ती करण्याकडे आणि दराच्या घटीच्या प्रमाणाकडे लक्ष देणार आहोत, शिवाय आमच्या कॉर्पोरेट बुकचा पुन्हा विचार करणे आणि मालमत्तासंबंधित  जोखीम कमी करुन त्याचा दबाव भांडवलावर सुलभ पद्धतीने आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आमचे प्रमुख भागधारक यापुढेही बँकेला पाठींबा देतील, असा  विश्‍वासही श्री. शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.