टेंभू योजनेतून माण-खटावसह 16 गावांना मिळणार पाणी
मुंबई, दि. 08 - टेंभू योजनेतून सातारा जिल्ह्यातील माण-खटावला पाणी मिळणे महत्वाचे असून त्यासाठी आवश्यक तो निधी जलसंपदा विभागाकडून देण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. टेंभू योजनेतून पाणी मिळाल्यामुळे मायणी तलाव, वरकुटे, मलवडी, शेनवडी, विरळीसह 16 गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात आज दि.7 रोजी माण-खटावसह इतर गावांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक बोलविली होती, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव रा.वा.पानसे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री.घोडे यांच्यासह माजी आमदार दिलीप येळगावकर, अनिल देसाई, बाळासाहेब मासाळ, सचिन गुदगे आदी ग्रामस्थ आणि अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत झालेल्या निर्णयामुळे माण तालुक्यातील विरळी, कापूसवाडी, लादेवाडी, वरकुटे, शेनवडी, महाबळेश्वरवाडी, बंडगरवाडी, कुरणेवाडी, खरातवाडी, काळचोंडी, कचरेवाडी, पान्हारवाडी या गावांना पाणी मिळणार आहे. आटपाडी कालव्याच्या शेवटच्या टोकापासून 8 किलोमीटर कालवा खोदून शेनवडी, वरकुटे, मलवडी आणि 7 किलोमीटर डाव्या कालव्याद्वारे कापूसवाडी, विरळी, काळचौंडी या गावाला आणि महाबळेश्वरवाडी तलावाला पाणी मिळणार आहे. टेंभू योजनेच्या टप्पा क्र. 3 अ पासून ब्रिटीशकालीन मायणी तलावात पाणी सोडण्यात येणार असून याद्वारे काजकात्रे, कलेढोण, अनफळे, म्हासुर्णे, चितळी, गुंडेवाडी, पाचवड, ढोकळवाडी, मुळीकवाडी, तरसवाडी, गारळेवाडी, मायणी, शेडगेवाडी, कान्हारवाडी, हिवरवाडी गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. महसूल मंत्री श्री. पाटील यांनी पुढाकार घेतल्याने गेल्या 14 वर्षापासून प्रलंबित असलेला 16 गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.