नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विनापरवानगी व्यवसायांवर कारवाई
नवी मुंबई, दि. 01 - नवी मुंबई महानगरपालिकेच्या परवाना विभागामार्फत विना परवाना व्यवसायांवर कारवाई करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त श्री. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारची कारवाई संपूर्ण महापालिका क्षेत्रात सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेलापूर व नेरुळ विभागातील 15 विनापरवाना उपहारगृह व सलून यांच्यावर कारवाई करण्यात आली. अद्यापपर्यंत 383 विनापरवाना व्यवसायांवर कारवाई करण्यात आली आहे. परवाना विभागामार्फत एकूण 2450 विनापरवाना व्यवसायिकांना नोटिस बजाविण्यात आलेल्या आहेत.सक्तीच्या कारवाई व्यतिरिक्त नागरिकांना / व्यवसायिकांना परवाने घेण्यासाठी सुलभ व पारदर्शी पर्याय म्हणून महापालिकाने माहे ऑक्टोबर 2016 पासून विविध परवाने ऑनलाईन देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याअंतर्गत अद्यापपर्यंत 273 परवाने निर्गमित करण्यात आले आहेत. तसेच परवाना नुतनीकरणाची सुविधा सुध्दा महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे व त्याअंतर्गत 05 परवान्यांचे नुतनीकरण झालेले आहे. ऑनलाईन सुविधेचा वापर परवाना नुतनीकरणासाठी सुध्दा होणार आहे. नवीन परवाना व परवाना नुतनीकरणासाठी व्यवसायकांनी महापालिकेच्या ीीींपाालेपश्रळपश.लेा या संकेतस्थळावर तात्काळ अर्ज सादर करावेत आसे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. यानंतर परवाना नुतनीकरण न करणा-या व्यवसायांवर व्यापक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेमार्फत सूचित करण्यात येत आहे.