Breaking News

जुलैमध्ये म्हाडाच्या 800 घरांसाठी सोडत निघणार

मुंबई, दि. 27 - मुंबईत जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हाडाच्या 800 घरांसाठी जाहिरात दिली जाणार आहे, अशी माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी  अधिकारी आणि उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी दिली.
मुंबई म्हाडासाठी दरवर्षी 31 मे पर्यंत सोडत निघते. मात्र अद्यापही म्हाडाची जाहिरात आली नव्हती, त्यामुळे यंदा सोडत निघणार नाही असा अंदाज बांधला जात  होता. मात्र यावर्षी उशीर झाला असला तरीही ऑगस्टमध्ये सोडत जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्या घरांसाठी सोडत असेल, ती घरे  गोरेगाव, सायन, मानखुर्द आणि मुलुंड या भागात देण्यात येणार असून सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर यादी जाहीर केली जाईल, असे म्हाडाकडून सांगण्यात  आले.