पुणतांब्यातील शेतक-यांनी मुंबईत घेतली शरद पवारांची भेट
मुंबई, दि. 27 - राज्यात झालेला अभूतपूर्व शेतकरी संप आणि त्यानंतर सरकारने शेतक-यांशी चर्चा करून कर्जमाफी जाहीर केली. त्या पार्श्वभूमीवर आज पुणतांब्यातील शेतक-यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
नियमित कर्जाचे हफ्ते फेडणा-या शेतक-यांना सरकारने 25 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. त्यात बदल करून दीड लाख रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शेतक-यांनी पवार यांच्याकडे केली.
सगळ्या शेतकर्यांचा साताबारा सरकारने कोरा करावा. तसेच शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकर्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशीही मागणी त्यांनी केली. या शेतकर्यांच्या संपूर्ण मागण्या केंद्र व राज्य सरकारसमोर ठेवणार असून येत्या दोन दिवसात त्याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकर्यांचे मत त्यांच्या समोर मांडणार आहे, असे आश्वासन पवार यांनी शेतकर्यांना दिले.
हे शेतकरी पुणतांबा, वारी आणि वैजापूर परिसरातील होते आणि त्यांनी नियमितपणे कर्जाची परतफेड केली होती. हे शेतकरी एकत्रितपणे विविध मार्गाने पैसे उभे करून दुर्बल शेतकर्यांनाही सामावून घेऊन कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न करत असतात. सरकारने कर्जमाफी केल्यानंतर या शेतकर्यांच्या भावनाही समजून घेणे आवश्यक आहे आणि त्यासाठी पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे रदबदली करावी, या अपेक्षेने हे शिष्टमंडळ येथे आले होते.