पंतप्रधान मोदी 6 जुलैपासून इस्त्रायल दौ-यावर
नवी दिल्ली, दि. 27 - पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जुलैपासून इस्त्रायल दौ-यावर जाणार आहेत. मोदी यांच्या रूपाने भारतीय पंतप्रधान प्रथमच इस्त्रायल दौ-यावर येत आहे . हा दौरा ऐतिहासिक होण्यासाठी दोन्ही देशांकडून तयारी केली जात आहे. पंतप्रधान मोदी व इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांच्यात होणा-या महत्त्वपूर्ण करारांपैकी एक पाणी धोरण हा एक करार असणार आहे. भारत अन्य देशाशी असा करार प्रथमच करत आहे.
पंतप्रधान नेत्यनाहू व त्यांचे सरकार पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत हे त्यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमधून दिसून येते. साधारणत: कोणत्याही देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष पाहुणे म्हणून देशात येणार असतात. त्या आधी एक-दोन दिवस आधीपासून ट्विटरवर पोस्ट केल्या जातात. मात्र पंतप्रधान मोदी यांच्या दौ-याला अजून आठवडा बाकी आहे.
नेत्यनाहू यांनी पंतप्रधान मोदी यांना आपला मित्र म्हटले असून अधिकृतरित्या दौ-याची घोषणा केली आहे. गेल्या 70 वर्षांत पहिल्यांदा भारतीय पंतप्रधान इस्त्रायलला येत आहे आणि ही देशाची वाढती शक्ती दाखवून देत असल्याचेही नेत्यनाहू यांनी ट्विटरवर म्हटले आहे.