Breaking News

भारत -अफगाणिस्तानमधील कॉरिडोरवर चीनी प्रसार माध्यमांची टीका

बीजिंग, दि. 27 - भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान होत असलेल्या डेडिकेटेड एअर कॉरिडॉरवर चिनी माध्यमांनी टीका केली. भारताकडून अफगाणिस्तानमध्ये तयार होत असलेला कॉरिडॉर हा भारताचा हेकेखोरपणा असल्याची टीका चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान बनत असलेला कॉरिडॉरचे गेल्या आठवड्यात उद्घाटन करण्यात आले होते. भारत आणि अफगाणिस्तानमधील द्विपक्षीय व्यावसायिक संबंध वाढविण्यासह मध्य आशियाई देशांना भारतीय बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने हा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे.
अफगाणिस्तान आणि इराणच्या सहकार्याने चाबहार बंदर विकसित करत असून, त्या माध्यमातून समुद्री मार्गे व्यापार वाढवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. भारत अफगाणिस्तान आणि इराणसोबत व्यावसायिक संबंध वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. भारताची समुद्रीमार्गे संपर्क वाढवून क्षेत्रिय विकास करण्याचा प्रयत्न करत आहे. यातून भारताची हेकेखोर वृत्ती दिसत असल्याचे या लेखात नमूद करण्यात आले आहे.