पाचो-यात 50 हजाराची दारु जप्त
जळगाव, दि. 20 - जिल्ह्यातील पाचोरा शहरातील गुरूदत्त कॉलनी भागात देशी विदेशी दारूचा गुप्तपणे सुरू असलेला गुथ्था आज पोलिसांनी सापळा रचून आरोपीस रंगेहात पकडले सोबत 50 हजार रुपयांची देशी विदेशी दारू जप्त केली. पोलीस प्रशासनाने केलेली ही कारवाही मुळे. शहरात चोरट्या पध्दतीने सुरू असलेल्या दारू विक्रेत्यांचे धाबे दणादले आहे.
शहरात राज्य महामार्गाच्या आदेशामुळे अनेक दारू दुकाने आणि बिअर बार बंद पडल्याने तळीरामांची तहान भागवण्याचे काम शहरात अनेक कान्याकोप-यात गुप्तपणे सुरू आहेत. शहरातील गुरूदत्त कॉलनी भागात संशयित आरोपी बापु अर्जुन महाजन यांच्या घरात देशी व विदेशी दारुचा गुथ्था गुप्तपणे सुरू असल्याची खबर पाचोरा पोलिसांना मिळाली . उपविभागिय पोलीस अधिकारी केशव पातोंड यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक धनंजय वेरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे यांनी राहुल सोनवणे, प्रकाश पाटील,किरण पाटील, राहुल बेहरे व गजानन काळे यांचे पथक तयार करून परिसरात सापळा रचला. खबरीने दिलेल्या माहिती नुसार सदर संशयित आरोपीच्या घरावर छापा टाकला. यात 49531 रुपयांची देशी व विदेशी दारु आढळून आली. सदर मुद्देमाल पंचनामा करून पथकाने जप्त केली. आरोपी बापु अर्जुन महाजन यांच्या विरूध्द पोलीस नाईक राहुल सोनवणे यांनी मुंबई दारुबंदी कायदा अन्वेय गुन्हा दाखल केला आहे. शहरात आशा स्वरूपाची बेकायदा दारू विक्री करणारा कोणी आढळुन आल्यास पाचोरा पोलिसांशी संपर्क करावा, असे अवाहन पोलीस निरीक्षक धनंजय वेरूळे यांनी केले आहे.