सांगली जिल्ह्यातील 454 ग्रामपंचायतींची ऑक्टोबरमध्ये निवडणूक?
सांगली, दि. 20 - सांगली जिल्ह्यातील 454 ग्रामपंचायतींच्या चार हजार 300 जागांसाठी ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायतींची मुदत सप्टेंबर महिन्यात संपत असून ऑक्टोबर महिन्यात या निवडणुकीचे मैदान रंगणार आहे. त्यासाठी सांगली जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून पूर्व तयारीस सुरूवात करण्यात आली आहे.
सांगली जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती निवडणुकीपाठोपाठ या ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने गाव पातळीवरील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यातही पहिल्यांदाच उतरणार्या भाजपचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठे आव्हान असणार आहे.
सांगली जिल्ह्यातील 454 ग्रामपंचायतीतील चार हजार 300 जागांसाठी ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यात मिरज तालुक्यातील 38 ग्रामपंचायतीमधील 436 जागांचा, आटपाडी- 26 (224), पलूस- 16 (180), कडेगाव- 43 (393), वाळवा- 31 (149), शिराळा- 60 (504), जत- 81 (717), तासगाव- 26 (250), कवठेमहांकाळ- 27 (261), तर खानापूर तालुक्यातील 46 ग्रामपंचायतींमधील 386 जागांचा समावेश आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना या सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघातील प्रमुख व मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर आतापासूनच लक्ष केंद्रित करण्यास सुरूवात केली आहे. ही निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप अशी तिरंगीच होणार आहे.
याची सुरूवात काँग्रेसचे नेते माजी मंत्री तथा आमदार डॉ. पतंगराव कदम व काँग्रेसचे सांगली ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी पलूस व कडेगाव या दोन तालुक्यात बैठका घेऊन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेतील गटनेते आमदार जयंत पाटील वाळवा तालुक्यासह शिराळा, तर आमदार श्रीमती सुमन पाटील तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यात लक्ष ठेवून आहेत. भाजपचे नेते खासदार संजय पाटील यांनीही तासगाव व कवठेमहांकाळ या दोन तालुक्यावर अधिक लक्ष केंद्रित केले असून आमदार सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे यांनी मिरज, विलासराव जगताप यांनी जत, तर शिवाजीराव नाईक यांनी आपापल्या शिराळा तालुक्यात लक्ष घातले आहे. शिवसेनेचे एकमेव आमदार अनिल बाबर खानापूर व आटपाडी या दोन तालुक्यात लक्ष ठेवून आहेत.